जगन्नाथ शंकरशेठ (इ.स. १८०३ ते १८६५)
· जगन्नाथ
शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील
मुरकुटे कुटुंबात झाला.
· जगन्नाथ
उर्फ नाना शंकरशेठ यांना 'मुंबईचे शिल्पकार' म्हणून ओळखल जाते.
· मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत ते प्रगत होते.
· श्रीमंतीचा
व विद्ववत्तेचा वापर समाजसुधारणेसाठी केला.
· इंग्रज
अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता.
· एलफिन्स्टन
यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी
"स्थापन केली.
· मुंबईत
व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या.
· स्टुडंट
लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत
केली.
· राहत्या
घरी मुलींच्यासाठी शाळा सुरू केली.
· एलफिन्स्टन
कॉलेज सुरू केले.
· बोर्ड
ऑफ एज्युकेशन चे सदस्य. ( पुढे शिक्षण खात्यात रूपांतर).
· मुंबई
विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचा सहभाग.
· दादाभाई
नौरोजी यांच्या समवेत 'बॉम्बे असोसिएशन' या संस्थेची स्थापना.
· मुंबईच्या
कायदेमंडळाचे सदस्य.
· "नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते" - आचार्य अत्रे.
· ३१
जुलै १८६५ रोजी त्यांचा मृत्यू.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर (इ.स. १८९२ ते १८४६)
· आचार्य
बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म ६ जानेवारी १८१२ ला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर
तालुक्यातील पोंबर्ले येथे झाला.
· चाचपडणाऱ्या
समाजाला परिवर्तनाच्या काळात व्यापाकदृष्टीने मार्ग दाखवण्याचे व समाज जागृतीचे
काम केले.
· संस्कृत, इंग्रजी, गुजराथी, बंगाली,
फारसी आदी भाषांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते.
· बॉम्बे
नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी.
· अक्कलकोट
च्या युवराजाचे शिक्षक.
· एल्फिन्स्टन
कॉलेज मध्ये असिस्टंट प्रोफेसर.
· शिक्षकांच्या
अध्यापन वर्गाचे संचालक.
· मुंबई
इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती.
· इतिहास
संशोधन,
शिलालेख वाचन, ताम्रपटांचा शोध यांमध्ये
निपुण.
· इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयावर पुस्तके
लिहिली.
· शून्यलब्धी', 'हिंदुस्थानचा इतिहास', "हिंदुस्थानचा प्राचीन
इतिहास', 'सार संग्रह', 'इंग्लंडचा
इतिहास' इ. ग्रंथ प्रसिद्ध.
· ज्ञानेश्वरीचे
पाठभेदासह संपादन केले.
· १८३२
मध्ये
'दर्पण' हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र
सुरू केले व 'दिग्दर्शन' हे मासिक सुरू
केले.
· आद्य
सुधारक,
मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक,
सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, शिक्षणतज्ज्ञ,
श्रेष्ठ पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी
सुधारक म्हणून जांभेकरांचा सन्मान केला जातो.
· १७
मे १८४६ रोजी बनेश्वर येथे मृत्यू.
दादोबा पांडुरंग तर्खडकर (इ. स. १८१४ ते १८८२)
· दादोबा
पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म इ. स. ९ मे १८१४ रोजी मुंबईत झाला.
· मराठी
भाषेचे गाढे विद्वान, मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून
ओळख.
· मराठी
व्याकरणाचे पाणिनी म्हणून संबोधले जाते.
· जावरा
संस्थानच्या नवाबाचे शिक्षक म्हणून काम केले.
· एलफिन्स्टन
संस्थेत सुरतला शिक्षक म्हणून नियुक्ती.
· १८१६
ला ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्ती.
· १८५२
मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती.
· भिल्लांच्या
बंडाचा बीमोड त्यांनी कुशलतेने केला.
· निवृत्तीनंतर
बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून काम केले.
· सरकारने
त्यांना
'रावबहादूर' ही पदवी दिली.
· सामाजिक
व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला.
· १८४४
मध्ये त्यांनी सुरत येथे दुर्गाराम मंछाराम, दिनमणी शंकर
दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने 'मानवधर्म सभा' स्थापन (कार्यकर्त्यां अभावी ही संस्था जास्त काळ टिकू शकली नाही).
· ईश्वर
एक आहे,
मनुष्यमात्राची जात एक आहे, धर्म एक आहे,
परमेश्वरप्राप्तीसाठी भक्ती करावी, सर्वांशी
समानतेने वागावे इत्यादी उदात्त तत्त्वांचा पुरस्कार केला.
· १८५९
मध्ये भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यांसारख्या
मित्रांच्या मदतीने परमहंस सभेची स्थापना. (यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या
स्थापनेला गती मिळाली).
· आधुनिक
ज्ञान व विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हे
समाजाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे मानले जातात.
· १७
ऑक्टोबर १८८२ रोजी मृत्यू.
लोकहितवादी (इ.स. १८२३ ते १८९२)
· लोकहितवादी
उर्फ गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुणे येथे झाला.
· महाराष्ट्रातील
धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींची ओळख.
· इंग्रजी.
संस्कृत,
फारसी, गुजराथी, हिंदी
इ. भाषांमध्ये निपुण.
· दुभाषी, शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम
कमिशनर, जज्ज आदी पदांवर त्यांनी काम केले.
· सरकारने 'रावबहादूर' ही पदवी देऊन नावाजले.
· भाऊ
महाजन यांच्या प्रभाकर मध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून 'शतपत्रे' लिहली.
· लक्ष्मीज्ञान', ‘गीतातत्व’, ‘जातिभेद’, ‘भरतखंडपर्व',
'भिक्षुक', 'लंकेचा इतिहास', 'ऐतिहासिक गोष्टी', 'पानिपतची लढाई', 'कलियुग' आदी ग्रंथांचे लेखन.
· समाजातील
अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा,
खुळ्या समजुती इत्यादींवर त्यांनी सडेतोड विचार मांडले.
· बालविवाह, हुडा, बहुपत्नीत्व यावर त्यांनी हल्ला केला.
· उच्चवर्णीयांनी
आपल्या वर्ण श्रेष्ठत्वाचा त्याग करून समाजहितासाठी नवीन आचारविचाराचा स्वीकार
करावा असा त्यांनी आग्रह धरला.
· धार्मिक
सुधारणेविषयीचे विचार अत्यंत चिंतनीय.
· लोकांच्या
निष्क्रियतेवर टीका करून कृतिशील बनले पाहिजे असा आग्रह धरला.
· १९
व्या शतकाच्या भारतीय समाजव्यवस्थेतील दोष आणि वैगुण्य यांवर अचूक बोट ठेवले.
· सर्वांगीण
सुधारणेचे 'आयप्रवर्तक' म्हणून
संबोधले जाते.
· समाजाची
प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या, भौतिकशास्त्राचे
ज्ञान, आधुनिक उद्योगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला.
· समाजातील
भेदभाव नष्ट झाले तरच समाज एकजिनसी बनेल आणि त्याच समाजात राष्ट्रीयत्वाची भावना
वाढीस लागेल असे त्यांचे मत होते.
· काळानुसार
धर्मात व चालीरीतीत बदल करावेत, जातीयता नष्ट करावी,
स्त्रियांना शिक्षण व बरोबरीचे स्थान दयावे, आळशीपणा
सोडून उदयोगी बनावे, स्वशासन पद्धती प्रवृत्तीवादी होणे या
सर्व मार्गांनी समाजसुधारणा होऊ शकतात हे त्यांनी शिकवले.
· ९
ऑक्टोबर १८९२ रोजी मृत्यू.
भाऊ दाजी लाड (इ. स. १८२४ ते १८७४)
· रामचंद्र
विठ्ठल लाड म्हणजेच भाऊ दाजी लाड यांचा जन्म ७ सप्टेंबर १८२४ रोजी गोव्यातील
मांजरे येथे झाला.
· महाराष्ट्रातील
एक निष्णात डॉक्टर, विदयापडित, संशोधक व समाजसेवक.
· पदवीनंतर
दोन वर्षे एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक.
· नोकरी
सोडून मुंबईतील ग्रंट मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला.
· १८५१
मध्ये वैद्यकीय पदवीचे संपादन.
· अचूक
निदान व कुशल शस्त्रक्रिया यामुळे व्यवसायात नावलौकिक.
· कुष्ठरोगावर
एक चांगले औषध शोधून काढल्यामुळे 'धन्वंतरी' म्हणून ओळखले जाते.
· ज्ञानप्रसारक
सभेमार्फत शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न केले.
· स्त्री
शिक्षणाचे पुरस्कर्ते. मुलींच्यासाठी आर्थिक झळ सहन करून शाळा सुरू केली.
· मुंबई
विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार.
· समाजातील
अनिष्ट प्रथा, परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी मोहीम
उघडली. विधवा विवाहाचा पुरस्कार केला.
· जगन्नाथ
शंकरशेठ यांच्या मदतीने १८५२ मध्ये 'बॉम्बे
असोसिएशन' ही संघटना स्थापन केली. (भारतातील राजकीय
स्वरूपाची पहिली संघटना)
· ईस्ट
इंडिया असोसिएशनच्या कार्यातही सहभाग.
· लायसेन्स
बिलाचा व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून त्याला विरोध केला.
· इतिहास
संशोधनाच्या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय.
· सामाजिक
व राजकीय समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला.
· ३१
मे १८७४ रोजी मृत्यू.
भाऊ महाजन (इ. स. १८१५ ते १८९०)
· भाऊ
महाजन कुंटे यांचा जन्म १८१५ मध्ये कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे झाला.
· समाजसुधारणेसाठी
सडेतोड व समतोलपणा जोपासणारे विचारवंत.
· बाळशास्त्री
जांभेकरांचे वर्गमित्र.
· 'दर्पण' व 'दिग्दर्शन' यात लेखन करत होते.
· 'प्रभाकर' नावाचे साप्ताहिक सुरू केले.
· 'धूमकेतू' व 'ज्ञानदर्शन'
मधून सामाजिक विषयांवर लेखन केले.
· सण
१८९० मध्ये मृत्यू.
संदर्भ : महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता ११ वी. “जुना अभ्यासक्रम” (मराठी माध्यम)
Maharashtracha Itihas - standard 11th. “old syllabus” (Marathi Medium)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा