महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग - ३

डॉ. रा. गो. भांडारकर (इ. स. १८३७ ते १९२५)



·  रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे ६ जुलै १८३७ रोजी झाला.

·  त्यांचे आडनाव पत्की असे होते, मात्र त्यांचे पूर्वज खजिन्यात अधिकारी असल्यामुळे त्यांना भांडारकर असे उपनाव मिळाले.

·  मुंबई विद्यापीठातून एम. ए. ची पदवी तर जर्मन विद्यापीठातून पीएच. डी. त्यांनी मिळवली होती.

·  कर्ते, धर्म व समाजसुधारक, भाषातज्ज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक, प्राच्चविदया संशोधक, संस्कृत भाषेचे पंडित अशा वेगवेगळ्या नात्यांनी महाराष्ट्र त्यांना ओळखतो.

·  प्रार्थना समाजाच्या स्थापनेत भांडारकरांचा समावेश होता. प्रार्थना समाजाची तत्त्वे, उद्दिष्टे आणि प्रतिज्ञा या तयार करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले.

·  हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, अवतारकल्पना, बहुदेवतावाद इ. बाबींना डॉ. भांडारकरांनी विरोध केला.

·  वेद, उपनिषदे, भगवद्गीता, संतवाङ्मय इ. प्राचीन धर्मग्रंथांचा आधार देऊन समाजातील अपप्रवृत्ती व अनिष्ठरूढी कशा चुकीच्या आहेत ते दाखवून दिले.

·  बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह संमती, वयाचा कायदा यांसारख्या सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला, स्त्री शिक्षण अस्पृश्यता निवारण, मद्यपानबंदी, देवदासी प्रथा बंदी इ. सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.

·  विधवा विवाहाचा पुरस्कार केला. त्यांनी स्वत:च्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणून विचाराला कृतीची जोड दिली.

·  मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य, केंद्रीय लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते.

·  ‘अल हिस्टरी ऑफ डेक्कन’, ‘वैष्णविझम’, ‘शैविझम अँड अदर मायनर’, ‘रिलिजन्स’, ‘हिस्टरी ऑफ इंडिया’ इ. विपुल ग्रंथसंपदा होती.

·  इ. स. २४ ऑगस्ट १९२५ रोजी मृत्यू.

 

 

बेहरामजी मलबारी (इ. स. १८५३ ते १९१२)



·  १८५३ मध्ये गुजरातमधील बडोदा येथे पारशी कुटुंबात जन्म.

·  बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक आणि विधवा पुनर्विवाह पद्धतीचे समर्थक, समाजातील दुर्बल घटकांचे कैवारी.

·  १८८४ मध्ये बालविवाहाच्या प्रथेला विरोध करणारी टिपणे प्रसिद्ध केली.

·  बालविवाहाचे अनिष्ट परिणाम स्पष्ट करणारे पाठ शालेय अभ्यासक्रमात घ्यावेत, विधवाना पुनर्विवाहाचा हक्क असावा इत्यादी मागण्या त्यांनी शासनाकडे केल्या.

·  ‘इंडियन स्पेक्टॅटर’ हे साप्ताहिक सुरू केले.

·  दादाभाई नौरोजी यांच्या ‘व्हॉइस ऑफ इंडिया’ या नियतकालिकात ते लेखन करत.

·  दयाराम गिडुमल यांच्या मदतीने ‘सेवासदन’ ही संस्था स्थापन केली.

·  गुजराथ अॅण्ड गुजराथीज, नीती विनोद, बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य काही टिपणे इत्यादी ग्रंथ लिहिले.

·  इ. स. १९१२ मध्ये मृत्यू.

 

 

गो. ग. आगरकर (इ. स. १८५६ ते १८९५)



·  गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड जवळीला टेंबू येथे इ. स. १४ जुलै १८५६ मध्ये झाला.

·  व्यक्तिस्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार करणारे विचारवंत.

·  विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्या मदतीने पुणे येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली.

·  लो. टिळकांच्या मदतीने 'केसरी' व ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यातील केसरीचे संपादन आगरकर करत होते.

·  लो. टिळक व इतरांच्या समवेत आगरकरांनी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरू करण्यात आले. त्याच कॉलेजचे ते प्रिन्सिपॉल होते.

·  केसरी सोडून ‘सुधारक’ हे वृत्तपत्र लोकजागृतीसाठी सुरू केले.

·  व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरला. व्यक्ती विकासातून समाजाचा विकास होतो असे त्यांचे मत होते.

·  बालविवाह, जातिभेद, केशवपन, धर्माच्या नावावर चाललेल्या गैर प्रकारांना विरोध करून सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.

·  ‘केसरीतील निवडक निबंध’, ‘सुधारकातील वेचक लेख’, ‘वाक्य मीमांसा’, ‘वाक्याचे पृथक्करण’ इत्यादी ग्रंथांचे लेखन केले.

·  अज्ञान, अंधश्रद्धा, दांभिकता याला विरोध केला.

·  इ. स. १७ जून १८९५ रोजी मृत्यू.

 

 

पंडिता रमाबाई (इ. स. १८५८ ते १९२२)



·  जन्म कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील गंगामुळे या गावी २३ एप्रिल १८५८ रोजी झाला.

·  पंडिता रमाबाई व बंधू श्रीनिवास यांनी कलकत्त्यात आपल्या पांडित्याने व संस्कृत ज्ञानाच्या आधारे लोकांना थक्क केले. लोकांनी त्यांना ‘सरस्वती’ व ‘पंडिता’ या पदव्या देऊन गौरवले.

·  स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती करण्यासाठी ‘आर्य महिला समाजाची’ स्थापना १८८२ मध्ये केली.

·  हंटर कमिशनपुढे स्त्री शिक्षणासाठी आग्रह धरला.

·  ख्रिश्चन धर्मातील सेवाभावी वृत्ती व मानवतावादी विचारांमुळे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

·  निराश्रित विधवा व अनाथ स्त्रियांच्या राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था असलेल्या शारदा सदन ची १८८९ मध्ये मुंबईत स्थापना केली. १८९० मध्ये या संस्थेचे पुण्याला स्थलांतर करण्यात आले.

·  ‘शारदा सदन’ च्या सल्लागार मंडळात न्या. रानडे, न्या. तेलंग, डॉ. भांडारकर यांसारख्या थोर व्यक्ती होत्या.

·  केडगाव येथे ‘मुक्तिसदन’ नावाची संस्था सुरू केली. त्यात अनाथ व विधवा स्त्रियांच्या शिक्षणाची, निवासाची आणि भोजनाची मोफत सोय केली.

·  ‘बायबलचे मराठी भाषांतर’, ‘स्त्रीधर्मनीती’, ‘दि हाय कास्ट हिंदू वुमन’ इत्यादी ग्रंथ उल्लेखनीय आहेत.

·  इ. स. ८ एप्रिल १९२२ रोजी मृत्यू.

 

 

 न्या. म. गो. रानडे (इ. स. १८४२ ते १९०१)



·  महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे १८ जानेवारी १८४२ रोजी झाला.

·  एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील अग्रणी म्हणून न्या. रानडे यांना मानले जाते.

·  कायदयाचा परिपूर्ण अभ्यास. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास विषयाचे प्राध्यापक झाले. पुढे न्यायाधीश म्हणून पुण्यात आले.

·  समाज व्यवस्थेतील दोष दूर झाल्याशिवाय लोकांत मूल्यांचा विकास होणार नाही असे त्यांचे मत होते.

·  राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि धर्मकारण ही समाजाची विविध अंगे असून एकमेकाला पूरक आहेत अशी विचारधारा.

·  समाजाची उन्नती व्हावयाची असेल सदसद्विवेकबुद्धी, समता, न्याय, बंधुभाव या तत्त्वावर आधारीत समाज रचना होणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते.

·  प्रार्थना समाजाच्या स्थापनेत असलेले योगदान, सार्वजनिक सभेतील जवळीक, सामाजिक परिषदेतील योगदान महत्वपूर्ण होते.

·  विधवा विवाहाचे समर्थन केले आणि त्यातूनच मुंबईत एक विधवा विवाह घडवून आणला.

·  हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली.

·  समाजकारण, राजकारण, अर्थकारण क्षेत्रांत न्या. रानडे यांनी आपल्या वैचारिक योगदानाने जागृती घडवण्याचे कार्य केले.

·  इ. स. १६ जानेवारी १९०१ रोजी मृत्यू.

 

 

संदर्भ : महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता ११ वी.  “जुना अभ्यासक्रम” (मराठी माध्यम)

          Maharashtracha Itihas - standard 11th. “old syllabus” (Marathi Medium)

टिप्पण्या