विष्णुबुवा ब्रम्हचारी (इ. स. १८२५ ते १८७१)
·
विष्णुबुवा
ब्रम्हचारी म्हणजे विष्णु भिकाजी गोखले यांचा जन्म कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील
शिरवली येथे १८२५ मध्ये झाला.
·
धर्मग्रंथ
व संस्कृत याचे गाढे अभ्यासक.
·
उदात्त
मानवतावादी ख्रिश्चन धर्मतत्वाच्या आधारे सुशिक्षित वर्गाला प्रभावित करण्याचे काम
केले.
·
ख्रिश्चन
धर्मप्रचारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत जाहीर व्याख्याने दिली.
·
वैदिक
धर्म कसा महान आहे हे लोकांना पटवून द्यायचे काम केले.
·
‘वर्तमानदीपिका’
या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.
·
पुनर्विवाह,
प्रौढविवाह, घटस्फोट, शुद्धीकरण या विषयी पुरोगामी विचारधारा.
·
‘भावार्थ
सिंधू’, ‘वेदोक्त’, ‘धर्मप्रकाश’, ‘सुखदायक’, ‘राज्यप्ररणी निबंध’, ‘सहजस्थितीचा
निबंध’, ‘बोधसागर रहस्य’, ‘सेतुबंधाणी टीका’ इत्यादी ग्रंथ लिहले.
·
इ. स. १८
फेब्रुवारी १८७१ रोजी मृत्यू.
महात्मा जोतीबा फुले (इ. स. १८२७ ते १८९०)
·
जन्म इ.
स. ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला.
·
आधुनिक
महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते, एक क्रांतिकारक व कर्त सुधारक म्हणून
लौकिक.
·
बहुजन
समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लढणारे
महामानव.
·
इ. स.
१८४८ मध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
·
इ. स.
१८५२ मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली.
·
विधवा
पुनर्विवाहास चालना दिली आणि इ. स. १८६४ मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला.
·
विधवा
स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेऊन समाजक्रांतीस चालना दिली.
·
स्वतःच्या
घरी बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना केली.
·
अस्पृश्यता हा मानवजातीला कलंक आहे अशी
विचारधारा आणि त्यातूनच स्वताच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी
खुला केला.
शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य :
·
शेतकरी व
बहुजन समाजात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता शिक्षणात आहे हे पटवून दिले.
·
‘शेतकऱ्यांचा
आसूड’ या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटले.
·
शेतकऱ्यांची
व बहुजणांची परिस्थिति बदल व्हावी म्हणून शिक्षण, वसतीगृह, सिंचन, धरणे, तलाव,
विहिरी यांच्यासारखे अनेक उपाय सुचवले.
·
इ. स.
१८८८ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवांच्या कार्यक्रमामध्ये ‘शेतकऱ्यांचे
प्रतिनिधि’ म्हणून पारंपरिक पोषाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले.
·
हंटर
कमिशन पुढे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी
केली.
·
इ. स. २८
नोव्हेंबर १८९० रोजी मृत्यू.
सावित्रीबाई फुले (इ. स. १८३१ ते १८९७)
·
जन्म ३
जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला.
·
महात्मा
फुलेंनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले
आणि पहिल्या स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवला.
·
अस्पृश्योद्धाराच्या
कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
·
बालहत्या
प्रतिबंधगृहातील अनाथ मुलांचे संगोपन केले. त्या अनाथ मुलांच्या 'माउली' होत्या.
·
प्लेगच्या
रोग्यांची शुश्रूषा करताना प्लेगची बाधा झाल्यामुळे इ. स. १० मार्च १८९७ रोजी
मृत्यू.
बाबा पदमनजी (इ. स. १८३१ ते १९०६ )
·
बाबा
पदमनजी मुळे यांचा जन्म बेळगाव येथे १८३१ मध्ये झाला.
·
त्यांचा
जवाहिरांचा व्यापार होता.
·
प्रारंभिक
शिक्षण बेळगावातील मिशनरी स्कूल मध्ये आणि नंतर मुंबई येथील विल्सन फ्री चर्च
स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
·
इंग्रजी, मराठी, संस्कृत,
कन्नड, गुजराती अशा भाषांचा अभ्यास केला.
·
ख्रिस्ती
धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले. परिणामी १८५४ मध्ये
त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
·
फ्री
चर्चच्या शाळेत शिक्षकाची नोकरी केली.
·
बायबल
आणि ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे काम.
·
मूर्तिपूजा
व जातिभेदास विरोध.
·
परमहंस
सभेचे सक्रिय सदस्य.( पुढे जाऊन सभेशी संबंध तोडले)
·
विधवा
पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी 'यमुना पर्यटन' या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला
वाचा फोडली.
·
समाजातील
अपप्रवृत्ती दूर व्हाव्यात हाच त्यांचा हेतू.
·
'अरुणोदय'
हे आत्मचरित्र.
·
इंग्रजी-मराठी
व संस्कृत-मराठी असे शब्दकोश लिहिले.
·
शंभराहून
अधिक ग्रंथांचे लेखन केले.
·
इ. स.
१९०६ मध्ये मृत्यू.
विष्णुशास्त्री पंडित (इ. स. १८२७ ते १८७६)
·
जन्म इ.
स. १८२७ मध्ये सातारा जिल्ह्यातील बावधन येथे झाला.
·
स्त्रियांच्या
उद्धारासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले अशा समाजसुधारकांत विष्णुशास्त्री
पंडित हे अग्रणी होते.
·
'इंदुप्रकाश'
या साप्ताहिकाचे ते संपादक होते. या वृत्तपत्रातून त्यांनी आपली
सुधारणावादी मते निर्भीडपणे मांडली.
·
स्त्री
शिक्षण, विधवा स्त्रियांचे प्रश्न, केशवपन, परदेशगमन, जरठविवाह,
जातिभेद इत्यादी प्रश्नांवर त्यांनी आपले सडेतोड विचार मांडले.
·
'पुनर्विवाह
उत्तेजक मंडळी' या सभेची स्थापना केली. या सभेमार्फत
विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले.
·
ईश्वरचंद्र
विद्यासागर यांच्या 'विधवा
विवाह' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला.
·
आपल्या
विचारांवरील निष्ठा एका विधवेशी विवाह करून प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केली.
·
बालविवाह
पद्धतीला विरोध केला.
·
ब्राम्हण
कन्या विवाह, विचार पुरुष सुक्त
व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानाचा
इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश हे त्यांचे
निवडक ग्रंथ आहेत.
·
मृत्यू
इ. स. १८७६ मध्ये झाला.
सार्वजनिक
काका (इ. स. १८२८ ते १८८०)
·
वासुदेव
गणेश जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांचा जन्म ९ एप्रिल १८२८ रोजी साताऱ्यात झाला.
·
सार्वजनिक
सभेचे मुख्य संस्थापक आणि आधारस्तंभ.
·
वासुदेव
बळवंत फडके यांचे वकीलपत्र सरकारच्या दबावामुळे कोणीही घेत नव्हते, मात्र मोठ्या उमेदीने व्यवसायाने वकील
असलेल्या सार्वजनिक काकांनी ते घेतले.
·
आँधचे
श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली १८७० मध्ये सार्वजनिक
सभेची स्थापना झाली. (राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनदशीर मार्गाने
कार्य करणारी सभा)
·
न्या.
रानडे व सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप दिले.
·
ब्रिटिश
सम्राज्ञीकडे भारतीयांना सामाजिक व राजकीय दर्जा द्यावा, स्वावलंबी बनवणारे शिक्षण दयावे, राजकीय हक्क दयावे अशी मागणी केली.
·
वृत्तपत्र
स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते.
·
देशाच्या
उन्नतीसाठी लघुउद्योगाचा आग्रह त्यांनी धरला. स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वदेशी
मालाची दुकाने काढली.
·
सार्वजनिक
काकांनी सार्वजनिक सभेमार्फत १८७६-७७ मधील महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त लोकांना
भरीव मदत दिली.
·
रेल्वे
उतारूंचे प्रश्न, संस्थानिकांचे
अधिकार राज्यातील देंगे याबाबत त्यांनी सरकारला सल्ले देऊन लोकहिताचे कार्य केले.
·
इ. स. २५
जुलै १८८० रोजी मृत्यू.
संदर्भ : महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता ११ वी. “जुना अभ्यासक्रम” (मराठी माध्यम)
Maharashtracha Itihas - standard 11th. “old syllabus” (Marathi Medium)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा